पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगतच चालला असून मंगळवारी तब्बल १२२ नव्या रूग्णांची भर पडली. शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ३३९ पर्यंत पोचली आहे. दिवसभरात एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७३ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने १२२ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णांपैकी ससून रूग्णालयात ०४, नायडू रुग्णालयात ९८ तर खासगी रुग्णालयांमध्ये २० रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.शहरात मंगळवारी दोन मृतांची नोंद करण्यात आली. ससून रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन मृत्यूंची माहिती पालिकेला कळविली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे. एकूण २१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. बरे झालेल्यांची एकूण संख्या २०३ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात एका दिवसांत कोरोनाचे उच्चांकी 143 रूग्ण वाढ ; तीन जणांचा मृत्यू गेल्या पन्नास दिवसांत पुण्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1491 वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये मंगळवार (दि.28) रोजी एका दिवसांत उच्चांकी म्हणजे तब्बल 143 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला. दरम्यान आता पर्यंत कोरोना झालेल्या 230 व्यक्ती ब-या होऊन आपल्या घरी देखील परतल्या आहेत.आता पर्यंत पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 491 वर जाऊन पोहचली आहे. यात आता पर्यंत एकूण 83 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ज्या झपाट्याने वाढत आहेत, त्या तुलनेत बरे होणा-या रूग्णांचे प्रमाण मात्र कमी आहेत. यामुळे पन्नास दिवसांत बरे होऊन घरी गेलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 230 आहे.पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती पुणे जिल्हा एकूण रूग्ण : 1491एकूण मृत्यु झालेले रूग्ण : 83बरे होऊन घरी गेलेले रूग्ण : 230____ पुणे शहर : 1320पिंपरी चिंचवड : 103पुणे ग्रामीण : 68