पुणे : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २४० कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात ९२४ रुग्णांची वाढ झाली आहे़. तर आज ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७३५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी ४४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४८० रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरात एकूण ६७ हजार ६५१ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १५ हजार ९३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५१ हजार ३५३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ५९३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. -----------------------------------दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ३२० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ३० हजार ४१ वर गेला आहे़
Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २४० जण कोरोनामुक्त ; ९२४ नव्या रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:06 PM
आज ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील रहिवाशी
ठळक मुद्दे आतापर्यंत ५१ हजार ३५३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत घरीशहरात आत्तापर्यंत १ हजार ५९३ जणांची कोरोनामुळे मृत्यू