पुणे : शहरात सोमवारी १३३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १५३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आज दिवसभरात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये २ जण पुण्याबाहेरील आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ५४६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ३२४ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार ४४३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४० हजार ६४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६१ हजार ८४४ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५१ हजार ८८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ६९६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात १ हजार १७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ----------------------------------पिंपरीत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ८४ हजार ७१० पिंपरी शहर परिसरामध्ये आज ११३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ११९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे शहरातील एक जणांचा बळी गेला आहे.शहर परिसरात कोरोना आलेख कमी होताना दिसून येत आहे. महापालिका परिसरांमध्ये विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ७३८ जणांना दाखल करण्यात आले होते. दिवसभरामध्ये आज १ हजार ७४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ८४९ झाली आहे. शहर परिसरामध्ये दिवसभरामध्ये १७४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११९ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण संख्या ८४ हजार ७१० झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ हजार ९९६ झाली आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १५२९ वर पोहोचली आहे.
Corona virus : पुणे शहरात सोमवारी १३३ तर पिंपरीत ११३ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 12:13 AM
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४० हजार ६४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपुणे शहरात १५३ तर पिंपरीत ११९ जण कोरोनामुक्तपुणे शहरात १ लाख ६१ हजार ८४४ जण पॉझिटिव्ह; यातील १ लाख ५१ हजार ८८९ कोरोनामुक्तपिंपरीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ हजार ९९६; त्यापैकी ८४ हजार ७१० कोरोनामुक्त