बारामती : बारामती शहरात कोरोना चा संसर्ग झालेल्या सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील 16 जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवले आहे . त्यापैकी 14 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे .आणखी दोन हाय रिस्क अहवाल अद्याप मिळाला नाही .त्यामुळे बारामतीच्या नागरिकांवर टांगती तलवार सध्या तरी कायम आहे .शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो .त्या रुग्णाचा मुलगा औषधविक्रेत्या कडे कामाला आहे .हा रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा .त्याच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णासह घरातील सदस्य घराबाहेर गेलेले नाहीत .त्यामुळे त्या 75 वर्षीय रुग्णाला कोरोना संसर्ग झालाच कसा,हा प्रश्न प्रशासनाची दमछाक करणार आहे .याबाबत प्रशासन शोध घेत आहे .
शहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत .काल सापडलेल्या सातव्या कोरोना रुगणाच्या घरातील 16 रुग्णांना पुण्याला कोरोनाची चाचणी करण्यासाठी नेले आहे.यामध्ये कोरोना रुग्णाच्या घरातील ३ मूले , ३ सुना मुलाचे सासू, सासरे,पत्नी व 7 नातवंडे यांचा समावेश आहे .त्यापैकी 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे .आणखी दोन हाय रिस्क अहवाल अद्याप मिळालेले नाहीत .[8:51 ढट, 4/15/2020] ऊीीस्रं‘ ङ४’‘ं१ल्ल्र: