पुणे: जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे. सद्य स्थितीत १ हजार ४६० कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये 3 हजार 771 सक्रिय कोरोनाबधित रुग्ण आहेत. कंटेन्मेंट झोनबरोबरच 'हॉटस्पॉट'गावांची संख्याही वाढत आहे. यात नगरपालिकांची संख्या ही जास्त आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हातील अनेक तालुक्यात कोरोनानाने पाय पसरले. नोव्हेंबरपासून आटोक्यात आलेली ही रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने पुन्हा खबरदारीचा उपाय म्हणून कंटेंटमेंट झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 460 सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये 3 हजार 771 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या झोनमध्ये ग्रामपंचायतीद्वारे आरोग्य विषयक उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या वर्षीपासून 13 हजार 543 कंटेन्मेंट झोन आरोग्य विभागाने जाहीर केले होते. मध्यंतरीच्या काळात यात घट झाली होती. या झोन मध्ये 1 लाख 277 रुग आतापर्यंत बाधित आढळले तर 94 हजार 282 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुकानिहाय कंटेंटमेंट झोन
तालुका कंटेंटमेंटझोन
आंबेगाव ५७बारामती २३२भोर १८हवेली ४७२इंदापूर ५१जुन्नर ६७खेड ६७मावळ २१८मुळशी २८पुरंदर १०७शिरूर ९४वेल्हा २एकूण १४६०