पुणे : रविवारी पुणे शहरात १५९ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, ८५ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.दररोजच्या तुलनेत रविवारी संशयितांचे स्वॅब घेण्याचे प्रमाण खुपच कमी होते. आज केवळ २३५ जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.दरम्यान आज शहरात आणखी ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातपर्यंत प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी ससून हॉस्पिटलमध्ये ६ जण, पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये ११९ जण तर खासगी हॉस्पिटलमध्ये ३४ जण पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनामुक्त झालेल्यांची आजची संख्या ही ८५ असून, आजपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी कोरोनामुक्त होऊन परतलेल्यांची संख्या ५ हजार १९ इतकी झाली आहे. तर आज मृत्यू झालेल्या ६ जणांमध्ये ससूनमधील एका रुग्णाचा समावेश असून, उर्र्वरित ५ रुग्ण हे खासगी हॉस्पिटलमधील आहे.तर आज जिल्ह्यातील 2 कोरोनाबधित रुग्णाचाही पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीला पुणे शहरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही २ हजार ४८४ इतकी असून, यापैकी २०९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहेतर ५० जण व्हेंटिलेटरवर आहेत.९ मार्च पासून आजपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेले एकूण ७ हजार ८८1 इतकी आहे.