पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवार (दि.१०) एका दिवसांत २८ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूची संख्या एक हजारा पार केली म्हणजे तब्बल १००७ वर जाऊन पोहचली आहे. तर शुक्रवारी नव्याने१५९८ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. पुणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एका दिवसांत दीड ते दोन हजारांच्या घरात रोज रुग्ण वाढत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाला पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला थोड्याच दिवसात जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठीच लाॅकडाऊन करत असल्याचे समर्थन प्रशासन करत आहे. -...............
पुुणे शहरात ९०३ कोरोनाबाधित
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शुक्रवारी ९०३ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २६ हजार ७७ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४४३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ९ हजार ८९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९०३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ७३७ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३६९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८०० झाली आहे. दिवसभरात एकूण ६०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४२२ रुग्ण, ससूनमधील १२ तर खासगी रुग्णालयांमधील १७५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार १८८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ९ हजार ८९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५४ हजार ९४३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७८६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
एकूण बाधित रूग्ण : ३५९९७पुणे शहर : २५८९२पिंपरी चिंचवड :६७७८कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३३२७मृत्यु : १००७