पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवार (दि.१२ ) रोजी एकाच दिवशी दीडशे पेक्षा अधिक म्हणजे १५६ तर शहरात १६४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर ७ रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार १३४ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मंगळवारी ८९६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५६ संशयित पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तर ७ रूग्णांचा मृत्यू झाला.पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये मंगळवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून दिवसभरात तब्बल १६४ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ७३७ झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल १२० रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १०७ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १६४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडू रुग्णालयात १३५ तर खासगी रुग्णालयांमध्ये १७ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ८२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५६ झाली आहे. दिवसभरात एकूण १२० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ६९ रुग्ण, ससूनमधील ७ तर खासगी रुग्णालयांमधील ४४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १२०९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३७२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९८९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ हजार ७४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९८८, ससून रुग्णालयात १०६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २७८ रुग्ण उपचार घेत आहेत.............पुणे शहर : २७६९पिंपरी चिंचवड : १७३कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २३६मृत्यु : १६८घरी सोडलेले : १३५८.एकूण बाधित रूग्ण : ३१३४
Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १६४ नवीन रूग्णांची वाढ ; जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १३४
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:56 AM
रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १०७ रुग्ण अत्यवस्थ
ठळक मुद्देशहरातील १६४ कोरोनाग्रस्त रूग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढले तब्बल १२० जण झाले ठणठणीत बरे