पुणे : पुणे शहरात रविवारी १ हजार ५०२ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ६५८ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १४ जण पुण्याबाहेरील आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडे सातवाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ८३३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५०२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ९४९ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ९४ हजार ४९७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १५ हजार ५४४ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ७६ हजार ६८६ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत २ हजार २६७ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ७१३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ४ लाख ४५ हजार ७५९ वर गेला आहे.
------