पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ९७ हजार ६८ झाली असून मंगळवारी दिवसभरात १६९५ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १४१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८९० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार २४७ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८९० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५२९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३६१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार १५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३३२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४१९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७९ हजार ४८९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार २४७ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७५३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ५७ हजार ८०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १६९५ नवीन कोरोनाबाधित, १४१९ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 10:39 PM
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७९ हजार ४८९
ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ८९० रुग्ण अत्यवस्थ; ४१ रुग्णांचा मृत्यूप्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार २४७