पुणे : रविवारी पुणे शहरात ६ हजार ६७ कोरोना संशयित नागरिकांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्याबरोबरच, अँटिजेन चाचणी करण्यात आली. अँटिजेन चाचणी व शनिवारी तपासणी केलेल्या नागरिकांच्या प्राप्त अहवालामध्ये आज एकूण १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साडेसहा वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार ५४५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९४ व्हेंटिलेटरवर, ४६७ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५०७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील होते. शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ झाली असून, यापैकी १ लाख १० हजार ९१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१ झाली आहे. आत्तापर्यंत शहरात ५ लाख ७४ हजार ९३२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात दिवसभरात १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ;१,५४५ झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:29 PM
शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१
ठळक मुद्देशहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ रविवारी ६ हजार ६७ नागरिकांची तपासणी