पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये दिवसभरात १७६ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार २६५ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १५७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १७६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ३९९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १७६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १३, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ११० तर खासगी रुग्णालयांमध्ये ५३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३६१ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १५७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११०२ रुग्ण, ससूनमधील १२ तर खासगी रुग्णालयांमधील ४३ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५०५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३९९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १४४१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५५ हजार १५० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६५४, ससून रुग्णालयात १६३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १५७ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १७६ नवीन कोरोनाबाधित; दिवसभरात १५७ रुग्ण झाले ठणठणीत बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 8:44 PM
एकूण कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या ७ हजार २६५ वर
ठळक मुद्दे१७६ अत्यवस्थ तर ११ रूग्णांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५०५