पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी १ हजार ५०६ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ५५ हजार ७६१ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १७९१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६३८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ५१२ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३८९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार १५३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात २३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३५ झाली आहे. दिवसभरात एकूण १७९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३६ हजार ९१४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १७ हजार ५१२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ८६३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख ७९ हजार २५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. हॅलो
Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 12:15 AM
विविध रुग्णालयात उपचार घेणारे ६३८जण अत्यवस्थ
ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ५५ हजार ७६१