पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात १८२ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार ४४७ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ४०२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १८२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १४१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७० झाली असून यामध्ये जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२४ रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६७५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४०२ झाली आहे.-------------जिल्ह्यात 248 नवीन रूग्ण तर 10 रुग्णांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात शुक्रवार (दि.5) रोजी एका दिवसांत 248 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 हजार 965 वर जाऊन पोहचली आहे.तर एकूण मृत्यू 401 झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि कॅन्टोनमेन्ट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. शुक्रवारी कॅन्टोनमेन्ट हद्दीत एकही नवीन रूग्ण सापडला नाही. तर ग्रामीण भागात देखील 11रुग्ण सापडले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्ण वाढ मात्र सुरूच आहे. ----एकूण बाधित रूग्ण : 8965पुणे शहर : 7522पिंपरी चिंचवड : 675कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 768मृत्यु : 401
Corona virus : पुणे शहरात वाढले १८२ नवीन रुग्ण; कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ४४७
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 10:37 PM
जिल्ह्यात 248 नवीन रूग्ण तर 10 रुग्णांचा मृत्यू दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे१८३ अत्यवस्थ तर ०९ रूग्णांचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७०शहरात दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून झाले बरे