पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मध्यवस्तीला पालिकेने सील केले असून याभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेने आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याविषयी आदेश काढण्यात येणार आहे. यापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील करण्यात आलेला आहे. शहरातील काही विशिष्ट परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आणखी २२ ठिकाणांवर सील करणे आवश्यक असल्याचे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
* ही आहेत नव्याने प्रस्तावित केलेली ठिकाणे : १) प्रायव्हेट रोड पत्रा चाळ, लेन क्र.१ ते ४८ व परिसर, ताडीवाला रोड प्रभाग क्र.२०२) संपूर्ण ताडीवाला रोड३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅन्ड, संत कबीर, अ. ऊ. कॅम्प चौक, क्वॉटर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र.२०५) विकास नगर,बवानवडी गाव६) लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड७) चिंतामणी नगर,बहांडेवाडी रोड प्रभाग. क्र. २६ व २८८) घोरपडी गाव, इ. ळ. कवडे रोड९) संपुर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८१०) सय्यदनगर, महम्मदवाडी-हडपसर प्रभाग क्र. २३, २४ व २६११) पर्वती दर्शन परिसर,१२) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजु व उजव्या बाजुस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड, पटेल टाइल्स, विक्रम टाइल्स, इराणी वस्ती सर्व्ह नं. ११ मशिदीचा मागचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न. ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक ४७ परिसराच्या दोन्हीबाजू१३) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग क्र. १४१४) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्र. ७१५) ठकइट रोड कोंढवा प्रभाग क्र. २६१६) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर१७) संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर१८) साई नगर कोंढवा प्रभाग क्र. २७१९) संपूर्ण विमाननगर प्रभाग क्र. ३२०) वडगावशेरी परिसर प्रभाग क्र. ५२१) धानोरी प्रभाग क्र. १२२) येरवडा प्रभाग क्र. ६