पुणे : शहरात गुरुवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.तर दिवसभरात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये ६ जण पुण्याबाहेरील आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४८१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी २७५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार ३२८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी १ लाख ६२ हजार ६४७ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५२ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात २ हजार ३७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२८ नवे कोरोनाबाधित : तर ३५६ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 8:43 PM
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७
ठळक मुद्देगुरुवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४८१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी