पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी दिवसभरात २४३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९५० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८१० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५४९ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण ३४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ९५३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ४५२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ५४९ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार २७८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ६८ हजार ५७९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
..... पिंपरीत १०६ जण कोरोनामुक्त; १९७१जणांना डिस्चार्ज पिंपरी : औद्योगिकनगरीत दिवसभरात १०७ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ हजार ९७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनाने दिवसभरात एकाचा बळी घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवाळीनंतर दोनशे आत आली आहे. तसेच तपासण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे.शहरातील विविध रुग्णालयात १ हजार ९८० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ४९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६७८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात १ हजार ९७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७६० वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्तीचा आलेख वाढलाकोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून शहर परिसरातील १०६ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ३८२ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ६३९ वर पोहोचली आहे.