ठळक मुद्देधोरणात्मक निर्णय घेऊन होतेय अंमलबजावणी
पुणे : कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुणे महापालिकेच्या १७ कोविड योध्यांना लवकरच २५ लाख रुपयांची मदत व वारसास नोकरीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्र शासनाच्या विमा योजनेतून ५० लाखांची विमा रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने, महापौर यांनी पक्षनेत्याच्या बैठकीत महापालिकेने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची तात्काळ मदत देण्याबाबत धोरणांत्मक निर्णय घेतला. याबाबतचे पत्र पालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडे सोमवारी प्राप्त झाल्याने, त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आज आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. ज्या १७ जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, त्या सर्वांच्या नातेवाईकांनी वारसास नोकरीची मागणी केली आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात त्यांना २५ लाख व वारस नोकरीचे पत्र दिले जाणार आहे. -------केंद्राकडील विमा रक्कम मिळण्याबाबत साशंकता कोविड योद्धे म्हणून कर्तव्य बजावताना कोरोनामुळे निधन झालेल्या सेवकांचा मृत्यू झाला, अशांना केंद्र शासनाने ५० लाखांचे विमा कवच दिले आहे. या विमा रक्कमेसाठी महापालिकेने ११ जणांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले आहेत. मात्र ते अद्याप मंजूर न झाल्याने ही रक्कम कधी मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.--------महापालिका सेवेतील २७ कोविड योद्ध्यांचा मृत्यू कोरोना आपत्तीत काम करताना पुणे महापालिका सेवेतील ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०१ सेवक कंत्राटी व ४६१ कायमस्वरूपी सेवेतील आहेत. तर यात २५ कायम सेवकांचा व २ कंत्राटी सेवकांचा मृत्यू झाला आहे. ७ सप्टेंबर पर्यंत कोरोनाबधितांपैकी ३३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर १९९ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ज्या २ कंत्राटी सेवकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यांना पालिकेची मदत कामगार कल्याण निधीतून देता येणार नसल्याने, सर्व साधारण सभेची त्यास विशेष मान्यता लागणार आहे.-------