पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शनिवारी ९ हजार ३३६ वर पोचला असून दिवसभरात २५४ रूग्णांची भर पडली. दिवसभरात बरे झालेल्या १६३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ८१० असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २५४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १७९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ६८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४३९ झाली आहे. दिवसभरात एकूण १६३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १०३ रुग्ण, ससूनमधील १० तर खासगी रुग्णालयांमधील ५० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ८७ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ८१० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ४७६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७१ हजार २१२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १ हजार ९०६, ससून रुग्णालयात १३३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७७१ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले २५४ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ९ हजार ३३६ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 8:56 PM
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०८ जणांची प्रकृती चिंताजनक
ठळक मुद्देबरे झालेले १६३ रुग्ण गेले घरी : दिवसभरात १४ जणांचा मृत्यू