शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ३०८ नवीन रुग्णांची भर; एकूण रुग्णांची संख्या ८१३४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 12:58 PM

बाप रे ! एकाच दिवसांत सर्वाधिक २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देतब्बल १६९ रुग्ण झाले बरे : १६५ अत्यवस्थ तर २५ रूग्णांचा मृत्यूशहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि.२) रोजी एकाच दिवसांत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१३४ झाली असून, एकूण मृत्यू ३६७ झाले आहेत. शासनाने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मंगळवारी एका दिवसांत ३०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ पुणे शहरामध्ये आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये ३१ व ग्रामीण भागात १३ नवीन रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागात नव्याने सापडत असलेले बहुतेक रूग्ण मुंबईतून आपल्या गावी आलेले आहेत किंव त्याच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. यामुळे ग्रामीण भागात ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात त्या भागावर आता अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 

शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ

 शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर जाऊन पोचला असून मंगळवारी दिवसभरात २६६ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या १६९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार ३३१ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २६६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२८ रुग्ण, ससूनमधील ०२ तर  खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३३१ झाली आहे.

__

एकूण बाधित रूग्ण : ८१३४पुणे शहर : ६८५७पिंपरी चिंचवड : ५५७कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ७२०मृत्यु : ३६७बरे झाले :४९२१

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर राम