पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ झाली असून, ९ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज अखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ४८० झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची एकूण संख्या २८९ एवढी झाली आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोनाबधित रुग्ण वाढीचा वेग कमी आहे. मात्र पुणे शहरात हा आकडा दिवसाला शेकड्याच्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात नव्याने १७रुग्ण सापडले आहेत.------पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मंगळवारी २४६ ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७ झाली आहे. बरे झालेल्या १४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २७९ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २४६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
......................
मंगळवारी कोरोनाबधित रुग्ण रात्री ९ पर्यंतपुणे शहर : २५५पिंपरी चिंचवड : ४०कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३२मृत्यु : २८९