पुणे : शहरात गुरूवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३७८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ४६५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, आजची पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.२४ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १६५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३६४ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील ३ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४७१ इतकी झाली आहे़.
शहरात आजपर्यंत ८ लाख २९ हजार ८६७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७१ हजार ५२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६१ हजार २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
==========================