पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ आहे. ३ एप्रिलपासून नित्याने दहा-वीस रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, गुरुवारी ही संख्या १२ वर आली होती.त्यामुळे वाढ आटोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु, कोरोनाचा धोका अजून टळला नसल्याचा इशारा शुक्रवारी (दि.10 )मिळाला. एकाच दिवसात तब्बल ३८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २४७ वर जाऊन पोहचली आहे. तसेच शुक्रवारी पुण्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बळींची संख्या आता अठ्ठावीसवर पोहचली आहे. पुण्यात शुक्रवारी सुमारे ३६४ नवीन कोरोना संशयित व्यक्तींना विविध रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले. या सर्व रूग्णांचे स्वॅब एनआयव्हीला पाठविण्यात आले. त्यापैकी ३८ व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा शुक्रवारी 28 वर पोहचला आहे. श्रीरामपूर येथील एका रुग्णासह भवानी पेठेतील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत.
त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. गुरूवारी एक पुरूष आणि एक महिला असे रूग्ण वाढले होते. त्यानंतर चोविस तासातच शुक्रवारी सायंकाळपर्यंत आणखी तीन रूग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज मिळाले आहेत. त्यात तीन जणांचा समावेश आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे-----पुण्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या: २४७पुणे शहर: २०७पिंपरी चिंचवड: २८नगरपालिका हद्द : ७पुणे ग्रामीण : ५एकूण मृत्यु : २५