शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३८९ नवीन कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या ११हजार ८५४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:31 PM

शहरात विविध रुग्णातील उपचार घेत असलेले २७३रुग्ण अत्यवस्थ..

ठळक मुद्देशहरातील कोरोना रुग्णांचा मृत्यू आकडा 500 वर

शहरातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा आकडा ५०० पार

दिवसभरात ३८९ ची वाढ : एकूण २७३ रुग्ण अत्यवस्थ, १८३ झाले बरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा ५०४ वर पोचला असून दिवसभराय रुग्णसंख्येत ३८९ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ८५४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १८३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार २६४ झाली आहे. विविध रुग्णालयातील २७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ४ हजार ८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३८९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २१६ तर खासगी रुग्णालयांमध्ये १६८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५०४ झाली आहे. दिवसभरात एकूण १८३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४६ रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ३२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार २६४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ८६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६८४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८६ हजार ८७१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ७८९, ससून रुग्णालयात १०९ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार १८८ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका