पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, गुरुवारी दिवसभरात ९७७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२,२८४ झाली. महापालिका हद्दीबाहेरील ४४ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र कोरोनामुक्त रुग्णांच्या नोंदीबाबत प्रशासनाचा भोंगळ कारभार गुरुवारी समोर आला. वेळोवेळी नोंद न झाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अचानक वाढून ५५८१ झाली. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या संगणकीय यंत्रणेत रुग्ण संख्या अद्ययावत करण्याबाबत गोंधळ होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. डाटा एन्ट्री करायची राहिलेल्या रुग्णांची माहिती गुरुवारी अद्ययावत करण्यात आली. शहरात गुरुवारी दिवसभरात ४१९८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. २४६५ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. दिवसभरात २० रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील आठ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८९१ तर महापालिका हद्दीबाहेरील २०२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. २९८० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ८८०२ जणांना घरी सोडण्यात आले. ५७२५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. महापालिका हद्दीबाहेरील १०३१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील २०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ४१७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २८३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.
Corona virus : पिंपरीत एकाच दिवशी तब्बल ५ हजार ५८१ जण कोरोनामुक्त; अचानक संख्या वाढण्यामागे ' हे 'आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 8:34 PM
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२,२८४ इतकी झाली.
ठळक मुद्देगुरुवारी दिवसभरात 977 रुग्णसंख्यानोंद न झाल्याने कोरोनामुक्त रुग्णसंख्येत अचानक झाली वाढ