पुणे : पुण्यात कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग लक्षात घेऊन असा सर्व परिसर त्वरीत सील करण्यात येत असताना देखील, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शुक्रवारी (दि.17) एका दिवसांत पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये तब्बल 59 ने वाढ झाली. यामुळे आता पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 565 वर जाऊन पोहचली आहे.गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुणे शहरामध्ये ही वाढ झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने अत्यंत कडक उपाययोजना सुरू केल्या. यामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच सील केलेल्या भागात अधिक लक्ष देऊन जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे शहरामध्ये सापडले आहे.तपासणी करण्यात आली. तर तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.----- पुण्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या: 565पुणे शहर: 480पिंपरी चिंचवड: 49पुणे ग्रामीण : 36एकूण मृत्यु : 50
Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:39 PM
देशात कोरोना रुग्ण मंदावल्याचे चित्र असताना पुण्यात मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे
ठळक मुद्देपुणे शहरामध्ये ही वाढ झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने अत्यंत कडक उपाययोजना सुरू