शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Corona virus: पुणे शहरात दिवसभरात ५९५ नवीन कोरोनाबधित;एकूण रुग्णसंख्या १३ हजार ९९४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:07 AM

विविध रुग्णालयात उपचार घेणारे 330 रुग्ण अत्यवस्थ

ठळक मुद्देशुक्रवारी 3 हजार 378 रुग्णांची स्वाब तपासणी आजारातून बरे झालेल्यांची संख्या 8हजार 633

पुणे : शुक्रवारी पुणे शहरात दिवसभरात कोरोना बाधित ५९५ रूग्णांची वाढ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १३ हजार ९९४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ३३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे.         पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ३३० रुग्ण अत्यवस्थ असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही ५ हजार ५७५ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५९५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३४३ तर खासगी रुग्णालयांमध्ये २३७ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.              शहरात शुक्रवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५७२ झाली आहे. दिवसभरात एकूण ३३१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २५६ रुग्ण, ससूनमधील १० तर  खासगी रुग्णालयांमधील ६५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ६३३ झाली आहे. -------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ३७८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू