शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:01 PM

जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई

ठळक मुद्देगावांनी राबविल्या अनेक योजना बाहेरील येणाऱ्या नागरिकांवर ठेवला वॉच, कोरोनाला रोखण्यासाठी गावपातळीवर समित्या

निनाद देशमुख पुणे : शहरापुरत्या मर्यादित असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता जिल्ह्यातही वाढत आहे. काही गावांपुरती मर्यादित रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील १४०७ गावांपैकी ७७३ गावे कोरोनाबाधित आहेत. तर ६३६ गावांनी कोरोना विषाणूला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवले आहे.     जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. कॅबचालक असलेला हा रुग्ण मुंबईवरून आला होता. यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने तातडीने जिल्ह्यात संचारबंदी केली. सुरुवातीला रुग्णवाढीचा वेग कमी होता. मात्र, नंतर जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांमुळे रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे.  वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर आणि गावपातळीवर अनेक निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावांनी स्वयंस्फूतीर्ने गावात बंद पाळले. हे बंद पाळताना गावातील आरोग्य यंत्रणा अबाधित राहील याची काळजीही घेण्यात आली. गावात दोन वेळेला औषध फवारणी करण्यात आली. यासोबतच बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षही स्थापन करण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक गावात दक्षता समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात विलगीकरण कक्षासोबतच बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले. जे नागरिक बाहेरून आले त्यांचे विलगीकरण करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या शाळा आणि काही इमारती अधिग्रहित करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले. सर्वात महत्त्वाची भूमिका आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांनी बजावली. पहिला रूग्ण आढळल्यापासून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन आजारी व्यक्ती आणि बाहेरून येणाºया नागरिकांची तपासणी त्यांनी केली. त्यांच्या सर्वेक्षणामुळे प्रशासनाला वेगाने निर्णय घेता आले. जिल्ह्यात टप्प्याटप्याने कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले. नागरिकांमध्ये आजाराविषयी सातत्याने जनजागृती करण्यात आली. बाहेर जातानाही या गावातील नागरिकांनी काळजी घेतली. या सर्व उपाययोजनांमुळे कोरोनाला रोखता आले.

............................

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सोबतच गावपातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या. विस्तार अधिकारी आणि बीडीओनी यावर लक्ष ठेऊन उपाय योजना केल्या. रूग्ण आढळलेल्या गावात कंटेन्टमेन्ट झोन तयार करण्यात आले. कोविड सेंटर उभारण्यात  आले. तसेच जनजागृती मोहिम राबविण्यात आली- आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी 

.....................

जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावेआंबेगाव तालुका- ४८बारामती तालुका- ६०भोर ९९ दौंड ३२हवेली १८इंदापूर ७० जुन्नर ६४ खेड     ६८मावळ   २५मुळशी   ४७पुरंदर   २८शिरूर  ३१वेल्हा   ४६ 

.................

आरोग्य केंद्राद्वारे कॉन्टेक्ट ट्रेसिंगजिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोधासाठी आरोग्य केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संशयितांची तपासणी करून पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यासाठी विशेष सुविधा जिल्ह्यातील केंद्रात राबविण्यात आली.

...............................

जिल्ह्यात सर्वेक्षणाची १४ वी फेरीजिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आशा आणि अंगणवाडी सेविकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आज पर्यंत सर्वेक्षणाच्या १३ फेºया पूर्ण झाल्या असून १४ वी फेरी सुरू आहे. या सर्वेक्षणात अनेक बाधित आढळले. तसेच जिल्ह्यात उपाययोजना करण्यासाठी हे सर्वेक्षण खूप फायदेशीर ठरले आहे.  

.....................१० मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

२५६८४- सध्याचे रुग्ण 

२६१९ - मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 

८६८१७ जणांची कोरोनावर मात 

१,४०७ - जिल्ह्यातील गावे 

२ लाख - पेक्षा जास्त नागरिकांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये आले आहेत. 

.................................

नेमके काय केले?1. गावातील मोठे बाजार बंद करण्यात आले. नागरिकांना घरपोच, भाजीपाला, किराणा देण्याची व्यवस्था गावपातळीवर दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांचे लक्ष3. गावात रोज दोन ते तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली. 4. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. 5. गावातील वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यासाठी रोज तपासणी. 6. गावात कोरोना जागृतीसाठी  मोहीम राबविण्यात आली. चौकाचौकांत फ्लेक्स तर ध्वनिक्षेपकाचा वापर7. बाहेरून येणाऱ्या नागरिकाना विलगीकरण करण्यासाठी कक्षाची स्थापना8. अंगणवाडी आशा सेविका यांच्यामार्फेत नित्यनियमाने गावांत सर्वेक्षण9. बाधित भाग कंटेन्मेंट झोेन जाहीर करून आरोग्य उपाययोजना करण्यास प्राधान्य10.बाधितांना तत्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका स्तरावर कोविड सेंटर स्थापन

घेतलेली काळजीगर्दी होत असल्यामुळे आठवडा बाजार प्रथमत: बंद केला . तसेच मोरगाव येथील सर्व व्यावसायिकांची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत .- नीलेश केदारी, मोरगाव, सरपंच

.............

शेत आणि घर संकल्पना अत्यावश्यक कामासाठीच ग्रामस्थ बाहेर पडतात. अन्यथा शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतात काम करणे आणि आपले घर ही संकल्पना राबविली आहे.    -ज्योती यादव,पाटेठाण, सरपंच

.............

बाहेरून येणाऱ्यांवर वॉचगावात आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. बाहेरून येणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांचे विलगीकरण करण्न्यात येत आहे.  निर्जंतुकीकरण करण्यासाठी रोज फवारणी.    

 - वैशाली कोहिनकर, सरपंच, कोहिनकरवाडी 

...................

ग्रामस्थांचा ग्रुपवालचंदनगर मोठे गाव आहे. बाहेरून येणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. ग्रामस्थांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. आरोग्य तपासणी आणि निर्जंतुकीकरण रोज होत आहे. - छाया मोरे, सरपंच, वालचंदनगर

.........................

आरोग्य साहित्याचे वाटपगावात आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापाºयांसोबत बैठक घेऊन दुकाने बंद ठेवली. तसेच गावात जनजागृती केली. - अस्मिता कवडे, सरपंच, ओझर नं. १ 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारीzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच