पुणे : लॉकडाऊन व नंतर पुणे शहरातील बहुतांश भाग सील करून कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव करत असतानाच, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या समोर येऊ लागली आहे़. गुरूवारी पुण्यात आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ६९ नवीन रूग्ण आढळून आले असून, या वाढीमुळे पुणे शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ४४२ झाली आहे. हा वाढीचा आकडा आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्णांचे सत्रही थांबले नसून, आज नव्याने ४ रूग्णांचा बळी गेला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 47 झाली आहे़. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या जेथे जास्त आहे अशा सील केलल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. त्यांना थेट तपासणीसाठी पालिकेने उभारलेल्या केद्रांमध्येच दाखल करण्यात येत असून, त्यांचे स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत. साधारणत: दिवसाला १०० ते १५० जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. यामुळे अधिकाधिक कोरोनाचे संसर्ग झालेल्या व्यक्ती उजेडात येत आहेत. यामुळे वेळीच त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे ठरत आहे. बुधवारी आढळून आलेल्या ६५ रूग्णांपैकी नायडू हॉस्पिटलमध्ये ५७, ससून हॉस्पिटलमध्ये ५ व शहरातील इतर खाजगी रूग्णालयांमध्ये ३ रूग्णांची समावेश आहे. सायंकाळी सातपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आज ससून हॉस्पिटलमध्ये पाच कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू झाला असून, यामध्ये दोन पुरूष व तीन महिला रूग्णांचा समावेश आहे. या पाचही जणांना अन्य आजारांने ग्रासलेले होते. आजपर्यंत पुण्यात जे रूग्ण दगावले गेले आहेत. त्यापैकी एकही रूग्ण केवळ कोरोनामुळे गेल्याचे अद्याप तरी आढळून आलेले नाही. तसेच जे रूग्ण दगावले आहेत. त्यांपैकी बहुतांशी जणांचे वय हे ६० च्या पुढेच आहे. १६ मार्चपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात आत्तापर्यंत २७ लाख ९८ हजार ६५१ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ . यापैकी १ हजार २६३ जणांना स्रिनिंगसाठी पाठविण्यात आले होते़. आज १४१ व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ यापैकी ६९ जण नव्याने कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे़.
......
पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५०६पुणे शहर - ४३२पिंपरी चिंचवड - ४५नगरपालिका हद्द - १६ पुणे ग्रामीण -१३एकूण मृत्यू - ४७