पुणे: पुणे विभागात ८११ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून विभागातील बाधित रुग्णांची संख्या २३ हजार ९७० झाली आहे. तसेच शनिवारी ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९९० वर पोहचली आहे. विभागात १४ हजार ४४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ८ हजार ५३५ रुग्ण आहे.तसेच ४९६ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.पुणे विभागात ८११ बाधित रूग्ण अढळून आले असून त्यात पुणे ७४७, सातारा जिल्ह्यातील २९, सोलापूरमधील १०, सांगली जिल्'ातील ६ तर कोल्हापूर मधील १९ रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९५९ होती. शनिवारी ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९९० झाली आहे. पुणे जिल्हयात १९ हजार ५८७ बाधीत रुग्ण असून ११ हजार ३७५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्'ात ७ हजार ५३२ अॅक्टिव्ह रुग्ण असून जिल्ह्यात एकूण ६८० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ३८१रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण ५८.०७ टक्के आहे.तर मृत्यूचे प्रमाण ३.४७ टक्के इतके आहे.सातारा जिल्हयातील कोरोना बाधित ९१७ रुग्ण असून ६८९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या १८९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४२ बाधित रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात २ हजार ३५० कोरोना बाधित रुग्ण असून जिल्'ातील १ हजार ४६२ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सोलापूरमध्ये ६४० अॅक्टीव रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण २४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात ३१९ कोरोना बाधित रुग्ण असून २०७ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या सांगलीत १०२ अॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण १० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ७९७ कोरोना बाधित रुग्ण असून ७१२ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.जिल्ह्यात ७५ अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण १० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात एकूण १ लाख ६० हजार ७१७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार ७८५नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ९३२ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १ लाख ३४ हजार ४८७ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून २३ हजार ९७० नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.