पुणे : शहरातील तब्बल ११ हजार ४० कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक ८७७ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १८ हजार १०५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५८९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार ४०३ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८७७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५३१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३१ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २९२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी १९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६६२ झाली आहे. दिवसभरात एकूण ५८९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३७५ रुग्ण, ससूनमधील ०८ तर खासगी रुग्णालयांमधील २०६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ४०३ झाली आहे.
------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २० हजार ८८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
.................
एकूण बाधित रूग्ण : २३६८०
पुणे शहर : १८२५६
पिंपरी चिंचवड : ३५८२
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १९४२
मृत्यु : ७८८