शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

Corona virus : पुणे जिल्ह्यात बुधवारी 98 रूग्ण वाढले ; कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 232 वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:25 AM

पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या देखील चांगली वाढली.

ठळक मुद्दे बुधवारी दिवसभरात 175 रूग्ण झाले कोरोना मुक्त; आत्तापर्यंत एकूण 175 रूग्णांचा मृत्यू

पुणे : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासत नव्याने 98 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली आहे. तर 7 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आज अखेर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 232 वर जाऊन पोहचली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 175 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात 175 रूग्ण कोरोना मुक्त झाले.पुणे जिल्ह्यात बुधवारी 864 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 98 रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर 834 संशयित रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत शहर, जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात एकूण रूग्ण तपासणीचे प्रमाण पाहिले असता रूग्ण वाढीचा वेग कमी झाल्याचे स्षष्ट होते. पंधरा दिवसापूर्वी 700 ते 800 रूग्णांची तपासणी केली असता शंभर पेक्षा अधिक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत होते. आता तपासणीचे प्रमाण 900 पुढे गेले असताना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभर पेक्षा कमी येत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या देखील चांगली वाढली आहे. यामुळे आता पर्यंत 1533 रूग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात आता  अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 1524 ऐवढी राहीली आहे. 

------ एकूण बाधित रूग्ण : 3232पुणे शहर : 2810पिंपरी चिंचवड : 177कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 285मृत्यु : 175घरी सोडलेले : 1533 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका