पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लोकांचे विनाकारण व मास्क न घालता बाहेर पडणाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून गेल्या ७ दिवसात मास्क न घातला बाहेर फिरणाऱ्या १ हजार ६६१ पुणेकरांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १ हजार ५२८ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.तसेच गेल्या २ दिवसात विना मास्क वाहनांवरुन फिरणाऱ्यांची ५१ वाहने जप्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील २०० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी व एक्झीट व इंन्ट्री पॉईटवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याठिकाणी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत तपासणी करण्यात येत आहे. तसेच पीए सिस्टिमद्वारे साडेतीन हजारांहून अधिक वेळा घोषणा करण्यात येत आहे. असे असतानाही शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
गेल्या दोन दिवसात सिग्नल जम्पींग करणारे ४९२, रॉग साईडने जाणारे १७६ आणि फुटपाथवर अतिक्रमण करुन गाड्या चालविणाऱ्या ८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
३ जुलै ते ९ जुलै पहाटे ५ पर्यंत केलेली कारवाई
विना मास्क फिरणारे १६६१
विना परवाना फिरणारे १५३८
वाहने जप्त। ४१४
अधिक प्रवासी। २२५
विना मास्क वाहने जप्त ५१