पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवार (दि.१६) एका दिवसांत तब्बल ४४२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर एका दिवसांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ६८५ झाली असून, एकूण मृत्यू ५२७ वर जाऊन पोहचले आहेत.गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा शहरी भागा सोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील कमी होताना दिसत नाही. मंगळवारी एकाच दिवसांत १६ व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करतात. परंतु, या परिसरातील नागरिक कंटेन्मेंट झोनचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रवास करतात, यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.------
शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी केला दहा हजाराचा आकडा पारपुणे शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी दहा हजाराचा आकडा पार केला. आज दिवसभरात २९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार १८३ इतकी झाली आहे.मात्र, यापैकी ६ हजार ५९६ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, यामध्ये आज कोरोनामुक्त झालेले १५० जण आहेत़ दरम्यान आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू शहरात झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० इतका होता. आज घेण्यात आलेल्या २ हजार ५४७ स्वॅब टेस्टिंग व कालचे प्रलंबित अहवाल यापैकी आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये २९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे शहराने कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजार पार केला आहे. सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी शहरात ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे. -------------एकूण बाधित रूग्ण : १२६८५पुणे शहर : १०३००पिंपरी चिंचवड : १२७४कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ११११