पुरंदर : पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या विरोधात लढा देणाऱ्या प्रशासनातील एका कर्मचाऱ्याचाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरीत जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील चांगले आहे. सहा जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. पुरंदर कोरोना लढ्याच्या विरोधात पुरंदरच्या तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्रास होत असल्याने तो गेल्या शनिवारपासून कामावर आला नव्हता. सोमवारी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी गेल्या पाच सहा दिवसांपासून इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नसला तरी ही पुरंदरच्या तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यांची ही कोरोना संसर्गाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांची माहिती घेतली जात आहे.पुरंदर तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून चार पाच जणांवर उपचार सुरू आहेत. सहा जण उपचारानंतर घरी आले आहेत. पुरंदरच्या कोरोना विरोधात लढणाऱ्यांवर कोरोनाच्या आघात केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना योग्य ते नियोजन आणि खबरदारी घ्यावी लागणार आहेऱ्या
Corona virus : पुरंदर तालुक्यात कोरोनाशी लढा देणाऱ्या प्रशासनातील कर्मचाऱ्यालाच संसर्ग झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:59 PM
पुरंदर तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देकर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कोणी आलेल्या सर्वांची कोरोना तपासणी होणार