पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार जाहिरात देऊनही, कोरोनाच्या भीतीने अनेक डॉक्टरांनी महापालिका सेवेत येण्यास उदासिनता दाखविली आहे.अखेर महापालिकेने लाखो रूपयांमध्ये पगार व विशिष्ट कालावधीचा करार आदी सुविधा देऊन पुन्हा जाहिरात दिल्याने, आजमितीला ही रिक्त पदे भरती प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीनंतर या सर्व जागा भरल्या जातील, अशी आशा आता आरोग्य विभागाला आहे. आरोग्य विभागातील २९ विभागात वर्ग एकची १२० तर वर्ग दोनची ५७ पदे रिक्त आहेत. या सर्व पदांकरिता पूर्वी दिलेल्या जाहिरातीस प्रतिसाद देत १ हजार १७ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र प्रत्यक्षात मोजक्याच जागा भरल्या गेल्या. परिणामी २९ जूनला पुन्हा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार, फिजिशियन (२० जागा), इन्टेसिव्हिस्ट (१० जागा), आयसी़यु़फिजिशियन (१० जागा), पेडियाट्रिशियन (१० जागा) याकरिता जाहिरात देऊन या जागेवर येणाºयांना प्रति महा सव्वादोन लाख रुपये पगारही देऊ केला आहे. याचबरोबर निवासी (चेस्ट, बी़टी़/ मेडिसीऩडी़एम/भूलतज्ज्ञ) व निवासी पेडियाट्रिशियन या ३० जागांसाठी ८१ हजार २५० रुपए प्रतिमहा पगार देण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान २९ जूनच्या जाहिरातीनुसार सोमवारपासून महापालिकेच्या मुख्य इमारतीत पद भरती प्रक्रिया सुरू झाली असली तरी, यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर किती येतील याबाबत शंका आहे. महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच ५० वैद्यकीय अधिकारी (एम़बी़बी़एस़) व ५० वैद्यकीय अधिकारी (बी़ए़एम़एस़) हवे आहेत. तर तेवढेच निवासी डॉक्टरांचीही गरज असून, २०० स्टाफनर्स यांची आवश्यक आहे. सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागात ही मुलाखत प्रक्रिया सुरू झाली असता, वैद्यकीय अधिकारी (कोविड -१९ आयुष प्रमाणपत्रधारक) या ९० जागांसाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु, यापैकी प्रत्यक्षात किती जण या कामी रूजू होणार हे आता कागदपत्रांच्या छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़रामचंद्र हंकारे यांनी, महापालिकेने सुधारित जाहिरात दिल्यानंतर पगारवाढ व इतर सुविधा दिल्याने प्रतिसाद चांगला मिळाला असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर तीन दिवसात यामध्ये किती तज्ज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी पदासाठी किती उमेदवार आले व किती पात्र आहे याचे चित्र स्पष्ट होईल व ती रिक्त पदे भरली जातील असेही सांगितले आहे.
Corona virus : पुणे महापालिकेने पगारवाढ दिल्यावरच रिक्त पदांसाठी डॉक्टरांसाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 12:27 PM
कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांनी सुरुवातीला भरती प्रक्रियेकडे फिरवली होती पाठ
ठळक मुद्देमहापालिकेने सुधारित जाहिरात दिल्यानंतर पगारवाढ व इतर सुविधा दिल्याने प्रतिसाद चांगला