बारामती : बारामती शहर परिसरातील जळोची येथील ज्योतिष व्यावसायिकाचा (वय ५०) कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.त्यांच्यावर रुई येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. शहरातील हा दुसरा,तर ग्रामीण भागातील कोरोनाचा चौथा बळी आहे.या मृत्युमुळे बारामतीकर कमालीचे धास्तावले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.
संबंधित व्यक्तीला मंगळवारी(दि ७) दुपारी ३.३० च्या सुमारास त्रास सुरु झाल्याने त्यांना रुईच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली. दम लागणे,खोकला,अशक्तपणा आदी आरोग्याच्या त्रास या ज्येष्ठाला जाणवत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. आरोग्य विभागाने तातडीने त्यांच्या घशातील स्वॅब घेत तो तपासणीसाठी पाठविला होता. त्यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारासाठीनेण्याची तयारी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र, पहाटे अडीचच्या सुमारास व्हेंटीलेटरवर असताना त्यांचा मृत्यु झाला. बुधवारी(दि ८)दुपारी मिळालेल्या अहवालामध्ये त्या ज्येष्ठाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.—————