Corona virus Baramati: बारामतीकरांचं कोरोनाने वाढवलं टेन्शन ; १४ दिवसांत आढळले ३ हजार ३७० कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:27 PM2021-04-14T21:27:44+5:302021-04-14T21:28:20+5:30

नागरिकांच्या बेपर्वाईमुळे बारामतीत चिंतेचे वातावरण

Corona virus Baramati: Increasing incidence of corona in Baramati; 3 thousand 370 corona patients found in 14 days | Corona virus Baramati: बारामतीकरांचं कोरोनाने वाढवलं टेन्शन ; १४ दिवसांत आढळले ३ हजार ३७० कोरोनाबाधित

Corona virus Baramati: बारामतीकरांचं कोरोनाने वाढवलं टेन्शन ; १४ दिवसांत आढळले ३ हजार ३७० कोरोनाबाधित

googlenewsNext

बारामती: शहर आणि तालुक्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. एप्रिल महिन्यात १४  दिवसांत आढळलेले कोरोनाबाधितांची आकडेवारी बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आहे. आजपर्यंत शहर आणि तालुक्यात ३ हजार ३७० कोरोनाबाधित आढळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा कोरोनाची आकडेवारी अधिक असल्याचे चित्र आहे.

बारामतीत कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने वाढत आहे.प्रशासनही लाट रोखण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे.मात्र, काही उदासिन नागरिकांसह काही कोविड रुग्णांमुळे कोरोनाचा आलेख घसरण्याचे सध्या कोणतेही संकेत नाहीत. त्यातच रेमडेसिव्हीरचा तुटवडा दिवसेंदिवस गडद होत आहे. मागणीच्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनाग्रस्तांची या इंजेक्शनसाठी धावाधाव सुरुच आहे. 

कालचे शासकीय (दि. १३) एकूण आरटीपीसीआर नमुने  ५१८ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील १७२ रुग्ण  पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १८ आहेत.  

काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह ८४ आहेत.कालचे एकूण अँटीजन २३४ असून त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह ७४ आले आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३३० आहेत.यामध्ये शहर १७७ ग्रामीण १५३ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

कोरोना आजपर्यंतची अपडेट
 एकूण रूग्णसंख्या- १२ हजार ३७५
एकूण बरे झालेले रुग्ण- ९ हजार ८३५
 आजपर्यंत एकूण मृत्यू - १९०
——————————————
...एकही रेमडिसिविर इंजेक्शन आलेले नाही
 रेडडिसीव्हर आवक जावक वापर समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बुधवारी(दि १४) बारामतीत एकही रेमडिसिविर  इंजेक्शन आलेले नाही.  मेडिकल ‘अटॅच’ असणाऱ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांची सोमवारी(दि १३) बैठक घेण्यात आली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना,त्यांच्या नातेवाईकांना मेडिकलची सोय असणाऱ्या रुग्णालयांनी रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी घ्यावी.याबाबत  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. अन्यथा संबंधितांना प्रांत कार्यालयाकडे तक्रार करावी,असे कांबळे यांनी सांगितले.
—————————————————

Web Title: Corona virus Baramati: Increasing incidence of corona in Baramati; 3 thousand 370 corona patients found in 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.