Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:01 PM2021-06-04T20:01:06+5:302021-06-04T20:01:35+5:30

बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे.

Corona virus Baramati: The number of corona patients in Baramati decreased; Only 14 in city areas and 35 in rural areas | Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

Next

बारामती: बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी(दि ४) प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे. गेल्या २४ तासात तपासलेल्या ४९८ नमुन्यांपैकी ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील १४ आणि ग्रामीण मधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. दुस-या लाटेत शुक्रवारी (ता. ४) प्रथमच कोरोनाबाधितांची आकडेवारी दहापेक्षा खाली आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार आता  बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वेगाने वाढले आहे. आजपर्यंत २४,५४९ रुग्ण बाधित झाले असून २३,०२८ रुग्ण बरे झाले आहेत. ६२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

आजपर्यंत एकूण रूग्णसंख्या २४ हजार ५१९ वर गेली आहे.  तर  एकूण बरे झालेले रुग्ण २३ हजार २८ असून आज एकुण ९६ जणांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकॉसिसचे एकूण रुग्ण- २१ आढळले आहेत. पैकी बारामती तालुक्यातील- १४ इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७ रुग्ण असल्याचे डॉ खोमणे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर आता संबंधिताचे अहवाल येईपर्यंत विलगीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तपासणीनंतर रिपोर्ट येईपर्यंत किमान २४ तासांचा कालावधी सध्या लागतो. स्वॅब तपासणीनंतर संबंधित व्यक्ती रिपोर्ट येईपर्यंत अनेकांच्या संपर्कात येते आणि त्याच्यापासून अनेकांना संसर्ग होतो. या पार्श्वभुमीवर आता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  
बारामती शहर गेल्या दोन महिन्यांपासुन बंद आहे.रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.
———

Web Title: Corona virus Baramati: The number of corona patients in Baramati decreased; Only 14 in city areas and 35 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.