पुणे : शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मध्यवस्तीतील दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी बहूल भागातील आहेत. या भागातील स्वच्छतागृहांची दिवसातून चार वेळा स्वच्छता केली जात असून निर्जंतुकीकरणही केले जात आहे. झोपडपट्ट्या, चाळी आणि दाटीवाटीच्या भागामध्ये स्वच्छतागृहांमधून कोरोनाची लागण होत असल्याचे केंद्रिय सचिवांनी कळविल्यानंतर याविषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. सर्वाधिक बाधित भागांमध्ये शहरातील एकूण स्वच्छतागृहांपैकी ५३ टक्के स्वच्छतागृहे आहेत. गेल्या पाच वर्षात नवीन स्वच्छतागृहं वाढली नसल्याचेही समोर आले आहे.केंद्रिय सचिवांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून सार्वजनिक स्वच्छतागृहांमधून कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून त्यापुर्वीच परिपत्रक निर्गमित करुन स्वच्छता गृहांच्या स्वच्छते संदर्भात सूचना दिल्या होत्या. शहरातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, कसबा विश्रामबाग आणि येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये राहण्यास आहे.झोपडपट्ट्या आणि चाळींसह काही प्रमाणात वाड्यांमध्ये आजही सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केला जातो. एका वस्तीमध्ये अंदाजे दोन ते पाच हजार नागरिक राहण्यास आहेत. वसाहतींमध्ये तीन ते पाच स्वच्छतागृहे बांधलेली असतात. काही ठिकाणी दुमजली स्वच्छतागृहे सुद्धा आहेत. महिला-पुरुषांकरिता वेगवेगळ्या असलेल्या या स्वच्छतागृहांचा वापर नागरिकांकडून केला जात असताना स्वच्छता राखली जात नाही. स्वच्छतागृहामध्ये गेल्यानंतर पान, तंबाखू अथवा गुटखा खाऊन थुंकणे, बेडके टाकणे, पाण्याचा पुरेसा वापर न करणे, दारुच्या वाटल्या, विटांचे तुकडे भाड्यांमध्ये टाकणे असे प्रकार घडतात. त्यामुळे वारंवार संडास तुंबण्याचे प्रकारही घडतात. या स्वच्छतागृहांचा वापर एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीने केल्यास त्याचा संसर्ग अन्य नागरिकांना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागात खबरदारी घेण्यात येत आहे.=====
गेल्या पाच वर्षात नवे स्वच्छतागृह नाही....मध्यवस्तीतील भागात गेल्या पाच वर्षात नवीन स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतू, वसाहतींमधील लोकसंख्येच्या प्रमाणात पाहता ९५ टक्क्यांपर्यंत स्वच्छतागृह उपलब्ध असल्याचे घनकचरा व्यवस्थापन वि•ाागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
======
गेल्या काही वर्षात नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून घेण्यावर भर दिला आहे. मध्यवस्तीतील वसाहतींमध्येही हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
======स्वच्छतागृहांची आकडेवारीप्रकार स्वच्छतागृहे संडास कक्ष वैयक्तिक स्वच्छतागृहेशहर १,४४४ १४,००० ४६,५००मध्यवस्ती ७४२ ७,३०० २४, ०००