पुणे : शहरातील कोरोनावाधितांची संख्या सोमवारी पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात ४०६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध प्रयोगशाळांमध्ये ४ हजार ८१५ तपासण्या करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८. ४३ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ५९४ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २६२ इतकी आहे़ तर आज दिवसभरात ४१५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९०६ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ११ लाख ४८ हजार ६६१ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३ हजार १०८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९३ हजार ३४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८५९ जणांचा मृत्यू झाला आहे.