पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार २०१ वर जाऊन पोहचला असून शनिवारी दिवसभरात १०८ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या १९४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १७० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २४८ झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०९ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १९४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२१ रुग्ण, ससूनमधील ०९ तर खासगी रुग्णालयांमधील ६६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ६४४ झाली आहे. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयायांमधील १२७, सा ससूनमधील ०७ तर खासगी रुग्णालयातील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २४८ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२०० नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४८ हजार ९६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५४७, ससून रुग्णालयात १४८ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५५३ रुग्ण उपचार घेत आहेत.