शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

Corona virus : पुणे शहरातील गोखलेनगर, जनवाडी आणि वडारवाडीत पुढील तीन दिवस पूर्ण संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:36 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी निर्णय

ठळक मुद्देवैद्यकीय अत्यावश्यक सेवा सगळी दुकाने राहणार बंद

पुणे : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी परिसरात बुधवारपासून पुढील ३ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ वैद्यकीय दुकाने वगळता किराणा दुकानांपासून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहे.याबाबत सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी आदेश काढला आहे. किशोरी शिंदे यांनी सांगितले की, जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर, वडारवाडी भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अस असतानाही नागरिक कोणतीही काळजी न घेता विनाकारण मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जनवाडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले की, या संपूर्ण परिसरात दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. तरीही त्याचा नागरिकांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आदेशानुसार या परिसरात पुढील तीन दिवस संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. तशी माहिती संपूर्ण परिसरात पोलीस व्हॅनवरुन देण्यात आली आहे. या भागातील दुकाने दुपारी २ पर्यंत उघडी ठेवली जात होती. नागरिकांना आवश्यक खरेदी करता यावी, म्हणून मंगळवारी ही दुकाने सायंकाळपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. केवळ दुध विक्री करणार्‍यांनाच या तीन दिवसात सकाळी २ तास दुध विक्रीची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांनी यावेळेत फक्त दुध विक्री करावी़ कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सध्या ३१८ अ‍ॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यात गेल्या काही दिवसात वडारवाडी १३०, जनवाडी ७५, हेल्थ कॅम्प, पांडवनगर ६६, गोखलेनगर ४१,  रामोशीवाडी २१ रुग्ण आहेत. त्यापैकी काही बरे झाले असले तरी गोखलेनगर, जनवाडी भागातून दररोज १० ते १२ तसेच हेल्थ कॅम्प पांडवनगर, वडारवाडी भागातून १० नवीन रुग्ण आढळून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस