पुणे : लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, लोकांनी घरात रहावे, म्हणून २४ तास रस्त्यावर बंदोबस्त करणार्या शहर पोलीस दलातील तब्बल २१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास पावणे दोनशे पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. मध्यवस्तीतील पोलीस ठाण्यातील सुरुवातीला लागण झालेले तसेच इतर असे १० पोलीस कर्मचारी आता पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एक पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला आह. सुरुवातीला यातील अनेक पोलीस कर्मचारी हे अतिसंक्रमित भागात कार्यरत होते. मात्र,आता ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाही अशा पश्चिम भागातील दोनपोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.विशेष म्हणजे त्यात एका महिला पोलीस कर्मचार्याचा समावेश आहे. त्यामुळेआतापर्यंत शहर पोलीस दलातील १७५ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनाक्वारंटाईन करावे लागले आहे. शहरातील मध्य वस्तीमधील पोलीस ठाण्यातील ६ पोलीस कर्मचारी बाधित झालेहोते. त्यातील एका जणाचा मृत्यु झाला आहे. अन्यसर्वांची क्वारंटाईनचीमुदत पूर्ण होऊन ते बरे होऊन घरी गेले आहेत.अतिसंक्रमित भागातील वाहतूक शाखेचा एक पोलीस कर्मचारी कोरोना बाधितअसल्याचे आढळून आले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांचीकोरोना चाचणी करण्यात आली. त्यात येरवडा व चंदननगर पोलीस ठाण्यातीलप्रत्येक एक पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.शहरातील पोलिसांना बंदोबस्तावर असताना व इतर वेळी कोरोना विषाणूपासून कशीसुरक्षितता बाळगायची याची सर्व माहिती दिलीजात आहे़ तसेच आवश्यक ते सर्व सुरक्षा साहित्य पुरविण्यात येत आहे, अशी माहिती शहर पोलीस दलाच्या वतीनेदेण्यात आली.
Corona virus : पुणे पोलीस दलातील २१ कर्मचारी कोरोनाबाधित, जवळपास पावणे दोनशे पोलिस क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 9:33 PM
लोकांनी घरात रहावे, म्हणून २४ तास रस्त्यावर बंदोबस्त करणार्या शहर पोलीस दलातीलतब्बल २१ पोलिसांना कोरोनाची लागण
ठळक मुद्देसंपर्कात आलेल्या जवळपास पावणे दोनशे पोलिसांना करावे लागले क्वारंटाईन १० पोलीस कर्मचारी आता पूर्णपणे बरे तर एक पोलीस कर्मचार्याचा मृत्यू