पुणे :कोरोना विषाणूंचे संक्रमण अजून पसरू नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना आता पुण्यात कोणत्याही रस्त्यावरून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती परदेशातून आणि त्यातही कोरोनाग्रस्त देशातून आली असेल तर तात्काळ स्क्रिनिंग केले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
सध्या पुण्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण असून राज्यात ४९ रुग्ण आहेत. ही संख्या नियंत्रणात रहावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.त्याच विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. शहरात मुंबई- पुणे महामार्ग, पुणे- बंगळुरू महामार्ग, जुना एक्प्रेस वे, रेल्वे स्टेशन अशा सर्व ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
यावेळी स्पष्ट करण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- शहरात जीवनावश्यक वस्तूची कमतरता भासणार नाही,शहरात होत असलेला पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल- N95 मास्क विषयी एफडीएला सूचना देण्यात आल्या आहेत,मास्क कमी पडू देणार नाही- एसटीच्या १हजार २४५ फेऱ्या रद्द
- उद्यापासून पुणे बाहेरून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाला निगराणीखाली ठेवण्यात येईल
-पुणे जिल्हयातील सेतू व मालमत्ता खरेदी विक्री ऑफीस पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील- पीएमपी पन्नास टक्के बंद करण्यात आल्या आहेत ,पीएमपीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- पुणे विमानतळावर रोज ११० विमाने ये-जा करत होती. ती आता ६८ वर आली आहे.