बारामती : बारामती शहरात आढळलेल्या दुसऱ्या कोविड-१९ संक्रमित रुग्णाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. बारामती शहरातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्याच्या कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नाती कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या सर्वांवर पुणे शहरातील नायडू रुग्णालय , ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत . समर्थनगर येथील या भाजी विक्रेत्याला रविवारी (दि. ४ )कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्याच्यावर उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे .दरम्यान 29 मार्च रोजी शहरात श्रीरामनगर येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र भाजी विक्रेत्याला अर्धाग वायूचा आजार होता .त्यातच प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे .या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या कुटुंबातील 16 जणांना सोमवारी(दि ६) रात्री ,तर त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या दोघा डॉक्टर,एक्सरे टेक्नीशियन आणि एका नर्सला मंगळवारी(दि ६)दुपारी तपासणीसाठी नेण्यात आले होते .त्यापैकी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मिळालेल्या अहवालानसुार, मंगळवारी मुलगा आणि सुनेसह १ आणि ८ वर्षाच्या नातीला संसर्ग झाल्याचे बुधवारी(दि ८) मिळालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. आज गेलेल्या कोरोनाच्या पहिल्या बळीने प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.शहरात खळबळ उडाली आहे .
Corona virus : बारामतीत कोरोनाचा पहिला बळी; प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 1:32 PM
त्याच्या कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नाती कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट
ठळक मुद्दे कोरोनाच्या पहिल्या बळीने प्रशासन अधिक अलर्ट