शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 4:28 PM

बारामतीत कोरोना रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला..

बारामती : बारामती शहर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.गेल्या २४ तासात ११० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.१०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्याची ही पहिलीच वेळ  आहे. येथील रुग्णांची संख्या १०११ पर्यंत पोहचली आहे. प्रशासनाने बारामतीकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मंगळवारी(दि. १) बारामतीमध्ये एकूण घेतलेल्या आरटीपीसीआर १४८ टेस्ट पैकी ७२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ३६ जणांच्या शासकीय एंटीजेन नमुन्यापैकी १८ जणांचा पॉझिटीव्ह आला आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले ६३ नमुन्यात पैकी २१ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आहे. आज सकाळपर्यंत ११० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.यामध्ये   शहर ६१, ग्रामीण मधील ४९ जणांचा समावेश  आहे. तसेच २४ तासांत एकुण सहाजणांचा मृत्यु झाला आहे. बारामती शहरात आजपर्यंत  एकुण  ४१ जणांचा मृत्यु झाला आहे.दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण काळजी घेणे अत्यावश्यक आहे .तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहे.त्यांच्या संपर्कात असणाऱ्या नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे.आपणाला प्रशासनामार्फत संपर्क साधला जाणार आहे. लक्षण विरहित रुग्णांनी अ‍ॅडमिट होण्यासाठी घाई करू नये .सर्वांना संपर्क साधला जाईल. कृपया प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे. तसेच अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत .त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. सर्व कामावर जाणाºया तरुणांनी  कामावरून घरी आल्यानंतर आपल्या ज्येष्ठ आई-वडील, आजी-आजोबा यांपासून सुरक्षित अंतरावर राहावे . त्यांच्याशी बोलताना घरांमध्ये सुद्धा मास्क वापरावे ज्यामुळे त्यांना होणारा कोरोणा प्रादुर्भाव टाळता येईल,असे आवाहन डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटल