शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

Corona virus : वैद्यकीय सेवेचा वसा समर्थपणे चालवत दाम्पत्यांची कोरोनासोबत लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 7:00 AM

मुलांना सोडून आईला राहावे लागते १५ दिवस रुग्णालयातच

ठळक मुद्देएकत्र कुटुंब पद्धतीचा झाला फायदा

लक्ष्मण मोरे पुणे : शहरातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. या परिस्थितीमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाग्रस्तांकरिता देवदूत ठरत आहेत. वैद्यकीय सेवेचा वसा घेतलेले असेच एक डॉक्टरदाम्पत्य कोरोनासोबत लढा देत आहे. घरामध्ये किशोरवयीन मुलांसह वयस्क आईवडिलांची काळजी घेत हे उच्चपदस्थ पती-पत्नी समर्पित भावनेने रुग्णसेवा करीत आहेत.डॉ. मिलींद खेडकर आणि त्यांची पत्नी डॉ. सुनिता असे या दाम्पत्याचे नाव आहे . डॉ. मिलींद हे महापालिकेचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकार म्हणून काम करतात. तर डॉ. सुनिता या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापिका आहेत. या दोघांन अथर्व (वय १५) आणि अमेय (१३) अशी दोन मुले आहेत. त्यांचे वडील (वय ७५) आणि आई (वय ७०) त्यांच्यासोबतच राहण्यास आहेत. वडिलांना वयोमानाप्रमाणे मधूमेह आणि रक्तदाब तर आईला रक्तदाब आणि संधिवाताचा त्रास आहे. या सर्वांची काळजी घेऊन हे दोघेही आपले कर्तव्य पार पाडत आहेत.सुनीता या ससून रुग्णालयातील कोरोना संक्रमित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करीत आहेत. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना आयसीयु व वॉर्डमध्ये सेवा देण्याचे काम त्या करीत आहेत. रुग्णांच्या श्वसनावर, तसेच शरीरातील ऑक्सिजनवर लक्ष ठेवणे, आवश्यकता सल्यास रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी टाकुन व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे जोखमीचे काम त्या सध्या करीत आहेत. कोरोना कक्ष सुरु झाल्यापासून सलग ७ दिवस ड्युटी करुन रुग्णालयाने नेमून दिलेल्या हॉटेलमध्ये राहावे लागत आहे. तसेच 7 दिवसानंतर त्याच हॉटेलमध्ये आणखी ७ दिवस विलग राहावे लागणार आहे. आजवर मुलांपासून एवढे दिवस कधीही दूर न राहिलेल्या सुनीता या ड्युटी संपल्यानंतर मुलांना व्हिडीओ कॉल करुन गप्पा मारतात. आई-वडिलांच्या सूचनांचे पालन करीत दिवसभर मुले अभ्यास व वाचन करीत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अर्थातच आजी आजोबांवर येऊन पडली आहे.

तर , पालिकेचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद हे डॉ. नायडू रुग्णालयासह अन्य आयसोलेशन आणि क्वॉरंटाईन सेंटर्स, सिम्बायोसिस रुग्णालय (लवळे) यांचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. दररोज, पालिका, नायडू रुग्णालय, सिंबायोसिस रुग्णालय येथे भेट देणे, दैनंदिन अडचणी सोडविणे, अहवाल पाठवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यासोबतच अंशदायी वैद्यकीय योजना व शहरी गरीब योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचेही काम ते करीत आहेत. एवढ्या धावपळीमध्येही दररोज एक तास व्यायामासाठी ते देतात. दरवर्षी होणाऱ्या लोकमत महामॅरथॉनमध्ये ते आवर्जून सहभाग घेतात. ड्युटी संपवून घरी आल्यानंतर स्वत:ची आणि इतरांचीही काळजी त्यांना घ्यावी लागत आहे.
=========कोरोनासोबत सर्व यंत्रणा ताकदीने लढा देत आहेत. आमच्यासारखे असंख्य वीर या लढ्यात काम करीत आहेत. आम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीमुळे झोकून देऊन काम करणे शक्य झाले आहे नागरिकांनी प्रशासन, पोलीस आणि पालिकेच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे.  आपण सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा.- डॉ. मिलींद व सुनीता खेडकर

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस