शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Corona virus : कोरोना आपत्तीत पुणे शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 1:45 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा शहरात वाढत गेला, तसे जुलै महिन्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन वर्षांची सरासरी पाहता ही वाढ़ तुलनेने समान

पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात ऑगस्टपर्यंत एकूण मृत्यूचा आकडा २०१९ च्या तुलनेत ४८३ ने वाढला असला तरी, गेल्या तीन वर्षांची सरासरी वाढ पाहता ती तुलनेने समान असल्याचे दिसून आले आहे.       पुणे महापालिकेकडे शासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी, २०२० ते ऑगस्ट, २०२० अखेर शहरात २२ हजार २५१ जणांचे मृत्यू झाले. २०१९ ची तुलना करता ते ४८३ ने अधिक आहेत. कोरोना संसर्गाची शहरात मार्च अखेरीस सुरुवात झाल्याने, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले. संपूर्ण एप्रिल महिना हा लॉकडाऊनमध्ये गेल्याने, या काळात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. परिणामी एप्रिल महिन्यात गेल्या २ वर्षांतील मृत्यू पाहता ते साधारणतः ३०० ने कमी झाल्याचे आढळून आले.        मात्र मे महिन्यात हा आकडा शहरात १ हजारांनी वाढला. तर जून महिन्यात पुन्हा १ हजार ने कमी झालेला दिसून आला. गेल्या वर्षी जून महिन्यात शहरात चिकुन गुनिया, स्वाइन फ्लू व इतर साथीच्या आजारानेन मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. जून, २०१९ मध्ये शहरात ३,८४२ जणांचा मृत्यू झाला होता. पण जून, २०२० मध्ये मृत्यूचे प्रमाण साधारणतः १ हजारने कमी झाल्याचे दिसून आले असून, या महिन्यात शहरात २,८६८ मृत्यू झाले आहेत.       कोरोनाचा प्रादुर्भाव जसा शहरात वाढत गेला, तसे जुलै  महिन्यापासून मृत्यू चे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात सरासरी पावणे तीन हजार मृत्यू असलेला हा आकडा यावर्षी ५०० ते ७०० ने वाढला आहे. शहरात जुलै मध्ये ३ हजार २४६ तर ऑगस्टमध्ये ३ हजार २६२ मृत्यू झाले आहेत. यात महापालिकेस राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा जास्त आहे.-------पुणे शहरातील मृत्यू ( १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट)२०१८ : २० हजार ३५५२०१९ : २१ हजार ७६८२०२० : २२ हजार २५१-------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यू