पुणे : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने किंवा कोरोना संसगार्ची भीती मनात असलेल्यांनी कोरोनाची तपासणी टाळण्याची गरज नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने अनेक जण कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यानंतरही चाचणी करण्यास घाबरत आहेत. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांनाही घरी सोडले जात आहे. या रूग्णांना १४ दिवस होम क्वारंटाईन् होण्याची अनुमती महापालिकेने दिली आहे.
महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले, ह्यह्यकोरोना पॉझिटिव्ह असलेल्या परंतु, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत किंबहुना लक्षणेही नाहीत अशा रूग्णांना आता घरी सोडले जात आहे. अट एकच आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरात स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय-स्नानगृह असले पाहिजे. तसेच त्यांची देखभाल घेण्यासाठी घरात सक्षम व्यक्ती असली पाहिजे. घरातल्या कोणालाही अन्य आजार असता कामा नयेत.ह्णह्ण
दरम्यान, गेल्या पाच दिवसात अडीचशेहून जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना होम क्वारंटाईनसाठी घरी पाठविण्यात आले आहे.
...................................
ही आहे भीती
तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटर अथवा ससून रूग्णालयात चौदा दिवस राहावे लागते, याची धास्ती अनेकांना वाटते. यामुळे अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही नागरिक स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत नाहीत. मात्र याच अनाठायी भितीमुळे कोरोनाचा फैलाव पसरण्याची शक्यता वाढते.
.................
महापालिकेचा दिलासा
या रूग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत अशा सर्व रूग्णांवर ह्यटेली मेडिसीनह्णव्दारे उपचार केले जात आहेत. जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या होऊन कोरोना संसर्गितांना इतरापासून विलग करून कोरोनाची साखळी तोडण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने महापालिकेने कोरोना संशयितांच्या रॅपिड टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अँटीजेन किटच्या माध्यमातून या टेस्टचा अहवाल आता अवघ्या २० ते ३० मिनिटांत प्राप्त होतो. पालिकेने १ लाख ह्यअँटीजेन किटह्ण खरेदीची मागणी नोंदवली असून येत्या आठवड्यापासून या चाचण्या सुरु होतील.